15 फेब्रुवारीपासून या लोकांचे राशन कार्ड धान्य होणार बंद यादीत नाव तपासा

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे.

लाभार्थी राशन कार्ड यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सोलापूर : अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी करण्याच्या सरकारच्या सूचना आहेत. त्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना ते अनिवार्य असून त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. मुदतीत आधार प्रमाणीकरण व ई – केवायसी न केल्यास धान्य मिळणार नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी दिली आहे.

लाभार्थी राशन कार्ड यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले जाते. त्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई – केवायसीसाठी गावोगावी शिबिर आयोजित केले आहे. शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी शिबिरात अथवा आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवासी करावयाची आहे. त्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत असून त्यानंतर धान्य दिले जाणार नाही. तशा सूचना दुकानदारांनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. दुकानदारांनी दरमहा ७ तारखेस अन्नदिन साजरा करुन लाभार्थ्यांना धान्य वाटप करावयाचे आहे.

लाभार्थी राशन कार्ड यादी मध्ये नाव

पाहण्यासाठी इथे क्लिक करा

कोणत्याही परिस्थितीत दरमहा १५ तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावयाचे असल्याच्या सक्त सूचना त्यांना दिल्या आहेत. अद्याप रेशनकार्ड नसलेल्या केंद्र सरकारच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत व असंघटित कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेंतर्गत तातडीने शिधापत्रिका देण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांमधून तातडीने शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे ज्यांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, मात्र अद्याप कोणतीही शिधापत्रिका मिळाली नाही त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या तहसील कार्यालयातून शिधापत्रिका मिळवावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी केले आहे.

त्याच रेशन दुकानात ई केवायसी करा

‘वन नेशन वन रेशनकार्ड’ अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानात जाऊन अन्नधान्य घेत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानात ई-केवायसी करुन घ्यावी. ते आपल्या गावातील रास्तभाव धान्य दुकानात जाऊनही ई-केवायसी करू शकतील, असे सरडे यांनी म्हटले.

..अन्यथा धान्य मिळणार नाही

शिधापत्रिका धारकांच्या सर्व लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरण व ई- केवायसी बंधनकारक आहे. शिबिर अथवा रेशन दुकानात त्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मुदतीत या दोन्ही बाबींची पूर्तता न केल्यास धान्य दिले जाणार नाही.

– संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर

Leave a Comment