डेटा बेस तयार करणार
केंद्र सरकार सरकारी आणि खासगी दवाखान्यातून याविषयीचा डेटा जमा करणार आहे. त्यामुळे त्याचा वापर करता येईल. मान्सून सत्रात दोन्ही सदनात, लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर करण्यात आले होते. रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ (अमेंडमेंट) बिल 2023 हे बिल मंजूर करण्यात आले होते.
काय होईल बदल
रुग्णालयात नागरिकाचा मृत्यू झाल्यास मृत्यू प्रमाणपत्र द्यावे लागेल. नवीन नियमानुसार रजिस्ट्रारला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंद करावी लागेल. गेल्या सात दिवसात प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. रजिस्ट्रारच्या कामावर नाराज असाल तर त्याविरोधात तक्रार करता येईल. 30 दिवसात अपील दाखल करता येईल. रजिस्ट्रारला 90 दिवसात उत्तर दाखल करावे लागेल.
काय होईल फायदा
जन्म आणि मृत्यू नोंदणीचा डेटा थेट निवडणूक आयोगाकडे जाईल. त्यामुळे जो नागरिक 18 वर्षांचा होईल. त्याचे नाव आपोआप मतदार यादीत येईल. तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येईल. त्यानंतर त्याचे नाव आपोआप मतदान यादीतून हटविण्यात येईल.
मागच्या दाराने NRC आणण्याची कवायत
AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या बिलावर टीका केली आहे. केंद्र सरकार मागच्या दाराने NRC आणण्याची कवायत करत असल्याचा आरोप त्यांनी केला. नित्यानंद रॉय यांनी 26 जुलै रोजी जन्म-मृत्यू (सुधारणा) बिल 2023 सादर केले होते.