योजनेचे फायदे आणि पात्रता

या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मुलीच्या जन्मावर शासनाकडून ५० हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. कुटुंबातील दोन मुलींना हा लाभ मिळू शकतो, परंतु दोनपेक्षा जास्त मुली असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असणे अनिवार्य आहे. तसे असल्यास तुम्ही या योजनेत अर्ज करू शकता.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)